जीवनशैलीतील बदल व चुकीच्या पद्धतीचा आहार-विहार यामुळे मधुमेह व उच्च रक्तदाब तसेच हृदयरोग हे आजार वाढत आहेत. त्यापैकी मधुमेह व उच्च रक्तदाब हे सायलेंट किलर(silent killer) आहेत, त्यापैकी मधुमेह याची मूळ कारण आज आपण या लेखांमध्ये माहिती घेणार आहोत यामध्ये मुख्यता टाईप टू (डायबिटीस)मधुमेह या कारणांचा विचार यामध्ये आपण करणार आहोत .
सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे
1) इन्शुलिन रेझिस्टन्स(insulin Resistance)
जीवनशैली मधील बदल, चुकीचा पद्धतीचा आहार विहार म्हणजे रिफंड प्रॉडक्ट ,रिफाइंड फ्लोअर (मैदा)ॲनिमल प्रोडक्ट्स(नॉनव्हेज व डेअरीचे )जास्त प्रमाणात सेवन जास्त प्रमाणात साखरेचा वापर यामुळे शरीरामध्ये इन्शुलिनचे प्रमाण वाढते त्यास हायपरइन्सुलिनेमिया (hyperinsulinemia ) असे म्हणतात.हे जास्तीचे इन्शुलीन आपल्या शरीरातील पेशींना इजा पोचवते, शरीरात सूज निर्माण होते व वजन वाढते. परिणामी आपल्या शरीरातील पेशी जास्तीचा इन्शुलिनचा विरोध करतात त्यास इन्शुलिन रेझिस्टन्स (insulin resistance)म्हणतात .
इन्शुलीन रेजिस्टन्स मुळे ग्लुकोज पेशींमध्ये शिरकाव (enter)करू शकत नाही परिणामी साखर(glucose) रक्तामध्ये वाढू लागते यालाच मधुमेह झाला असे म्हणतात . इन्शुलिन रेझिस्टन्स हे प्रौढ व्यक्तींमधील मधुमेहाचे सर्वात महत्त्वाचे मूळ कारण आहे. त्यामुळे मधुमेह( टाईप टू डायबिटीस )मध्ये इन्शुलिनचे प्रमाण जास्त असते,कमी नसते,जास्त करून पेशींमध्ये असणाऱ्या अवरोधामुळं (insulin Resistance)साखर वाढते.व मधुमेह होतो.
2) वजन वाढणे (obesity)
रिफाइंड प्रॉडक्ट ,रिफाईंड फ्लोअर (मैद्याचे पदार्थ)तसेच फास्टफूड ,साखरेचा अतिप्रमाणात वापर, व्यायामाचा अभाव, शारीरिक व मानसिक ताणतणाव ,अपुरी झोप यामुळे वजन वाढते . विशेषता पोटाच्या आजूबाजूची चरबी वाढते त्यालाच आपण सेंट्रल ओबीसीटी(central /abdominal obesity) म्हणतो. पोटाचा किंवा कमरेचा घेर (abdominal circumference)बत्तीस इंची च्या(32inch) पुढे गेल्यावर मधुमेह व हृदयरोग यासारख्या आजाराची संभावना वाढते, हे जास्तीची चरबी इन्सुलिन साखर व पेशीं यांच्या कार्यात अडथळा निर्माण करते. त्यासाठी पोटाचा घेर कमी करणे गरजेचे आहे व आहारामध्ये विशेषता मैद्याचे, ॲनिमल प्रॉडक्ट, फास्ट फूड चे प्रमाण कमी करणे गरजेचे आहे .मधुमेह हा साखरेचा आजार नसून चरबीचा आजार आहे. त्यामुळे जास्तीची चरबी कमी करणे गरजेचे आहे असे केल्यास मधुमेह व उच्च रक्तदाब हृदयरोग यासारख्या आजाराला प्रतिबंध घालता येईल.
3) पोषक तत्वांची कमतरता
-यामध्ये विशेषता विटामिन डी, विटामिन b12, झिंक, बी कॉम्प्लेक्स ,विटामिन ए, क्रोमियम ,ओमेगा थ्री फॅटी ऍसिड, या व सारख्या अनेक पोषणतत्वांची कमतरता झाल्यामुळे मधुमेह होण्याची शक्यता वाढते तसेच आहारामध्ये मैदा, फास्ट फूड याचं जास्त प्रमाणात सेवन, पालेभाज्यांची कमतरता ,फळांची कमतरता तसेच जास्त प्रमाणात शिजवलेले अन्न यामुळे पोषक तत्वांची कमतरता शरीरामध्ये निर्माण होते. परिणाम ग्लुकोज, इन्सुलिन व पेशी यांच्या कार्यामध्ये अडथळा निर्माण होतो.म्हणजे पेशींना साखर मिळत नाही. व ती रक्तामध्ये वाढू लागते. त्यामुळे मधुमेह होण्याची शक्यता वाढते. 4)इन्फ्लंमेशन(Inflammation)
म्हणजे शरीरात आणि शरीरातील पेशी वर येणारी विशेष प्रकारची सूज होय. ही सूज अत्याधिक प्रमाणात शारीरिक व मानसिक ताणतणाव ,आहारामध्ये साखरेचा, रिफाइंड प्रॉडक्ट तसेच फास्ट फूड ,व्यायामाचा अभाव यामुळे निर्माण होते .ही सूज इन्सुलिन, ग्लुकोज व पेशी यांच्या कार्यात अडथळा निर्माण करते .
5) स्ट्रेस –शारिरीक व मानसिक ताण (stres)
पोषणतत्वांची कमतरता यामध्ये विटामिन b12 व विटामिन डी यांची कमतरता ,तसेच अपुरा सूर्यप्रकाश , रिफाइंड प्रोडक्ट, व्यायामाचा अभाव यामुळे ताणतणाव मध्ये वाढ होत आहे. मधुमेहाच्या कारणांपैकी शारीरिक व मानसिक ताणतणाव हे मधुमेहाचे एक प्रमुख कारण आहे. वाढलेल्या मानसिक ताणतणावामुळे रक्तामधील साखर वाढत राहते व त्यामुळे वजन वाढते वाढलेले वजन ताणतणाव यामुळे मधुमेह होण्याची शक्यता जास्त निर्माण होते.
6)व्यायामाचा अभाव –
व्यायामाच्या अभावामुळे वजन वाढते तसेच इन्शुलिन रेझिस्टन्स (पेशीमधील अवरोध) पण वाढत आहे, यामुळेच नियमित व्यायाम केल्यास इन्शुलिनची सेन्सिटिव्हिटी वाढते व शारीरिक व मानसिक ताण तणावावर नियंत्रण ठेवता येते .
मधुमेहावर उपचार करताना कारणांचा विचार करणे गरजेचे आहे तसेच जीवन शैलीत योग्य तो बदल केल्यास व कारणांमध्ये तपासणी करून उपचार केल्यास मधुमेह मुळापासून पूर्णपणे बरा करता येतो.