केसगळती व उपचार - Dr. Pol's Vedamrut

Dr. Pol's Vedamrut

केसगळती व उपचार

केस गळणे ही समस्या आज-काल भरपूर लोकांना सतावत आहे, बहुतांशी लहान मुलांमध्ये तसेच स्त्रियांमध्ये ही समस्या वाढत आहे . केस गळती च्या कारणांचा विचार केला असता त्यामध्ये प्रामुख्याने केसांमधील कोंडा, केसांमधील सोरायसिस ,केमिकलयुक्त शाम्पू ,साबण व तेल यांचा अतिवापर, तसेच पोषक तत्वांची कमतरता ,प्रथिनांची कमतरता ,रक्ताची् कमतरता , हार्मोनचे असंतुलन ,थायरॉईड प्रॉब्लेम, अति क्षारयुक्त पाणी, प्रसूतीनंतर तसेच जेनेटिक इत्यादी प्रमुख कारणांचा विचार करता येईल ,बहुतांशी लोकांमध्ये स्थानिक दोष आणि केमिकल युक्त शाम्पू, साबण ,कंडिशनरचा अति वापर केल्यामुळे केस गळणे अधिक प्रमाणात आहे. .

केस गळतीवर उपचार करताना विविध कारणांचा विचार करावा लागतो. केस गळणे या समस्येचा विचार केला असता योग्य ते कारण शोधून काढून त्यावर त्यानुसार उपचार केले असता केस गळणे नियंत्रणात आणता येते.

केस गळणे यामध्ये स्थानिक दृष्टी असेल तर सौम्य आयुर्वेदिक अथवा हर्बल शाम्पू चा वापर करून ,पोटातून योग्य ती औषधे देऊन वरील समस्या नियंत्रणात आणता येते. तसेच त्याच्या जोडीला योग्य त्या औषधी तेलाचा वापर केल्यास केसातील कोंडा ही कमी होतो व केस गळती ही थांबते .आपल्या केसाचा विचार केल्यास आपले केस हे केराटिन नावाच्या प्रथिना पासून बनतात त्यामुळे केस गळती व प्रथिनांचा जवळचा संबंध आहे. शरीराला योग्य त्या प्रमाणात प्रथिने पुरवणे किंवा विविध पोषक तत्वे पुरवणे ही अत्यंत महत्वाची बाब आहे. त्यामुळे सर्वपोषक तत्वे आणि प्रथिने आहारातून कशी मिळतील यावर लक्ष देणे गरजेचे आहे ,योग्य संतुलित आहार तसेच त्या जोडीला योग्य औषधे पोटातुन घेतल्यास केस गळतीवर हमखास उपचार करता येतात.

हार्मोनचे असंतुलन असताना तसेच जीर्ण आजार कॅन्सर ,टीबी, एच आय व्ही ,मधुमेह , ताणतणाव असताना योग्य त्या तपासण्या करून तपासणी नुसार उपचाराची दिशा ठरवणे गरजेचे असते . कॅन्सरच्या रुग्णांमध्ये रेडिएशन थेरपी व किमोथेरपी मुळे शरीरातील चांगल्या पेशींचा नाश होतो बरोबर कॅन्सरच्या पेशी ही मारल्या जातात आणि या सर्वांमध्ये केसांचे नुकसान होते. टीबी , एच आय व्ही यासारख्या जीर्ण व्याधीमध्ये शरीराची रोगप्रतिकारक क्षमता कमी झालेली असते त्याला मुख्य कारण म्हणजे शरीराला प्रथिने व पोषणतत्वांची कमतरता असते .ताण तणाव असल्यास योगा, प्राणायाम, ध्यान पद्धतीचा वापर तसेच शारीरिक व्यायाम चे नियोजन केल्यास केस गळती वर नियंत्रण मिळवता येते .पण सामान्यता व्यवहारात केस गळती किंवा केस गळणे म्हटले की जाहिराती पाहून विविध केमिकलयुक्त शाम्पू, साबण , तेल तसेच कंडिशनर इत्यादी गोष्टींचा वापर वारंवार जास्त प्रमाणात केला जातो त्यामुळे केसांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते, व केस गळती थांबत नाही .केस गळती चा उपचार करताना कारणांचा विचार म्हणजे हार्मोनल असंतुलन ,ताणतणाव, रक्ताच्या तपासण्या तसेच योग्य आहार याचा समन्वय साधणे गरजेचे असते असे केल्यास केस गळणे या समस्येवर 100% नियंत्रण मिळवता येते .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *